Gondia News: मोरगाव शेतशिवारात विजेचा धक्का लागून बापलेकाचा मृत्यू | पुढारी

Gondia News: मोरगाव शेतशिवारात विजेचा धक्का लागून बापलेकाचा मृत्यू

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शेतामधे जनावरांच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सुरु असताना संपर्कात आल्याने विद्युत करंट लागल्याने बापलेकाचा मृत्यु झाल्याची घटना अर्जुनी मोर तालुक्यातील मोरगाव शेतशिवारात गुरूवारी (दि. 21) रात्री 10 च्या सुमारास घडली. वामण दुधराम हातझाडे (वय 50 ) व मुलगा संतोष वामण हातझाडे (वय 24) असे मृत बापलेकाचे नाव आहे. दरम्यान, विद्युत प्रवाह सोडणाऱ्या आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. Gondia News

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यामधील आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते वय (47 रा. मोरगाव) यांने आपल्या मकापिकाच्या शेताभोवती लावलेल्या कुंपन तारामधुन विद्युत करंट सोडल्याने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यु होण्याच्या संभव असण्याची जाणीव असताना आरोपी ने स्वतःचे राहते घरातुन विद्युत केबल टाकून कुंपनाच्या तारेला विद्युत करंट लावला. आरोपीचे शेत मृतकाचे घराचे मागे असल्याने मृतक वामण दुधराम हातझाडे हा त्या शेताजवळून रात्री 10 वाजता जात असताना विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारांना स्पर्श झाल्याने जागेवरच मरण पावला. तर आपले वडील आले नाही, म्हणून मुलगा संतोष गेला असता वडील खाले पडलेले आढळून आले. त्यांना उचलताना त्यालाही विद्युत करंट लागल्याने त्याचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. Gondia News

ही घटना मृतकाचे मुलीच्या लक्षात आल्याने तिने सावधगिरी बाळगून शेतमालकाला माहिती दिल्याने विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी दशरथ दुधराम हातझाडे यांचे तक्रारीवरुन अर्जुनी मोर. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे पाठविले. पोलीसांनी आरोपी ईश्वरदास मनोहर पर्वते यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्नाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम, बीट अंमलदार रोशन गोंडाणे, महेंद्र पुण्यप्रेड्डीवार करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button