Maha Shivratri : विदर्भाची काशी कोटेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची गर्दी | पुढारी

Maha Shivratri : विदर्भाची काशी कोटेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची गर्दी

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : विदर्भाची काशी अशी मान्यता असलेल्या वर्धा-यवतमाळ रोडवरील श्रीक्षेत्र कोटेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तांचा सागर उसळला आहे. कोटेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी असून महाराष्ट्राच्या विदर्भभूमीत वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले हेमाडपंथी शिवालय सज्ज आहे. ( Maha Shivratri )

संबंधित बातम्या 

कोटेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेला प्रारंभ झाला. कोटेश्वर हे भस्माच्या टेकड्यावर उभे असल्याचे सांगितले जाते. उत्तरवाहिनी नदी व अलौकिक निसर्गरम्य वातावरणात कोटेश्वर महादेवाचे दर्शन भक्त घेत आहेत. ‘कोटी कोटी यज्ञ करून पवित्र झालेली भूमी’ अशी, कोटेश्वरची आख्यायिका आहे. ( Maha Shivratri )

Back to top button