भंडारा: कैद्याचा महिला रक्षकावर हल्ला; वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी

भंडारा: कैद्याचा महिला रक्षकावर हल्ला; वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा कारागृहात एका कैद्याने महिला रक्षकावर हल्ला करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना टिप्परद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली. शाम उर्फ पीटी रमेश चाचेरे (वय ३५) असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  भंडारा कारागृहात कैद्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय आहे. घटनेच्या दिवशी न्यायाधीन बंदी शाम उर्फ पीटी रमेश चाचेरे (३५) याची व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होती. त्याची वेळ संपायला ५ मिनिटांचा अवधी होता. तेव्हा तिथे कर्तव्यावर असलेल्या महिला रक्षकांनी त्याला वेळ संपत  आल्याचे सांगितले. हे ऐकताच पीटी चाचेरे संतापला. कॉन्फरन्सची वेळ संपल्याने महिला रक्षक व्हिडिओ कॉल बंद करण्यास गेल्या असता पीटी चाचेरे महिला रक्षकांच्या अंगावर धावून गेला. त्यांना शिवीगाळ करीत हल्ला केला.

हा प्रकार महिला रक्षकांनी वरिष्ठांना सांगितला. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी संतोष क्षिरसागर आणि गुलाबराव खरडे हे आले. पीटीने त्यांनाही अश्लिल शिवीगाळ केली. तसेच गुलाबराव खरडे यांना 'तुला बाहेर बघून घेतो, आजच्या आज टिप्परद्वारे जिवे मारतो' अशी धमकी दिली.
याप्रकरणी महिला रक्षकांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिस ठाण्यात आरोपी न्यायाधीन बंदी शाम उर्फ पीटी चाचेरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news