चंद्रपूर : शिकारीच्या संशयाने वनाधिकाऱ्याची ६ जणांना बेदम मारहाण | पुढारी

चंद्रपूर : शिकारीच्या संशयाने वनाधिकाऱ्याची ६ जणांना बेदम मारहाण

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा

शिकारीच्या संशयावरून वन कर्मचाऱ्यांनी सहा जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात आज शुक्रवारी (दि. 26) ला घडला. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वनकर्मचा-यांच्या विरोधात पोलीसात तक्रार नोंदवून कठोर कारवाईकरीता जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणात दोन वन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिकार केल्याच्या संशयावरून वनकर्मचा-यांनी चंद्रपूर लगतच्या चिंचोली, भटाळी येथील ईश्वर रामटेके, हनुमान आसूटकर, संदिप आसूटकर, आकाश चांदेकर, मंगेश आसूटकर, ईश्वर रामटेके यांना चौकशीसाठी वन विभागाने बुधवारी आणि शुक्रवारी ताब्यात घेतले. व जंगलात जाऊन शिकार केल्याचा आरोप केला.

शिकारीबाबत वेगवेगळे प्रश्न विचारून वन कर्मचा-यांनी कार्यालयात नेऊन बेदम मारहाण (Beating) करून चार्जिंग बॕटरीने हातापायांना करंट लावल्याचा आरोप कुटूंबियांनी केला आहे. तसेच या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज शुक्रवारी पोलीसात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून दोघा वन कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटा आरोप लावून शिकारी प्रकरणात गोवून त्यांना बेदभ मारहाण (Beating) केल्याने नागरिक व कुटूबियांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सदर वनकर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याबाबतचे निवेदन वंचित नेते राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिले आहे.

हे ही वाचा

Back to top button