नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसची स्वराज्य सप्ताह बाईक रॅली | पुढारी

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसची स्वराज्य सप्ताह बाईक रॅली

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आज (दि.१९) बाईक रॅली काढण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय बजाज नगर नागपूर येथून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गांधी गेट महालपर्यंत शहराध्यक्ष प्रशांत पवार व कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवनकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, राज्य महिला आयोग सदस्या आभा पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभाग प्रभारी ईश्वरभाऊ बाळबुधे, माजी नगरसेवक राजेश माटे, महिला अध्यक्ष जयाताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बाईक रॅली काढण्यात आली. महाल गांधी गेट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून समारोप कऱण्यात आला.

हेही वाचा 

Back to top button