नागपूर : नंदनवन परिसरात सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण अपघा

नागपूर : नंदनवन परिसरात सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण अपघा
Published on
Updated on

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीकृष्ण नगर शक्तिमाता नगर परिसरात सोमवारी (दि. १९) रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने वेळीच सर्वजण बाहेर निघाल्याने अनर्थ टळला.अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून रात्री उशिरापर्यंत ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

सावजी यांचे हे श्रीकृष्ण डेकोरेशन असून याच ठिकाणी ही आग लागल्याचे व त्यात एका पाठोपाठ एक अशा पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. मंडप डेकोरेशन,बिछायत आणि केटरिंग व्यवसाय असल्याने हे सिलिंडर नेहमीप्रमाणे स्टॉक करून ठेवण्यात आले होते. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी झाली असून पोलीस आग्निशमन विभाग वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. शक्तिमाता नगरमध्ये या घराच्या आजूबाजूला एकही घर नसल्यानेही नुकसान टळले. लकडगंज, सक्करदरा, त्रिमूर्ती नगर, नरेंद्रनगर अशा अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मोठी हानी झाल्याची माहिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news