अकोला, पुढारी वृत्तसेवा : चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना अकोट अंजनगाव मार्गावरील पणज गावाजवळ रविवारी घडली. या अपघातात काकांचा मृत्यू तर पुतण्या जखमी झाला आहे .
या अपघातात तालुक्यातील रुईखेड येथील बंडू पुंजाजी दळवी हे जागीच मृत झाले. तर त्यांचा पुतण्या तुषार उर्फ शिवा दीपक दळवी हा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.