Dharmarao Baba Atram : शरद पवार स्वयंभू नेते, त्यांचा राष्ट्रवादीवर अधिकार नाही: धर्मरावबाबा आत्राम | पुढारी

Dharmarao Baba Atram : शरद पवार स्वयंभू नेते, त्यांचा राष्ट्रवादीवर अधिकार नाही: धर्मरावबाबा आत्राम

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वयंभू अध्यक्ष आहेत. प्राथमिक, क्रियाशील सदस्यही नसल्याने त्यांचा राष्ट्रवादी पक्षावर कुठलाही अधिकार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अध्यक्ष व आमचे नेते आहेत, असा पलटवार अजित पवार गटाचे नेते अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. राज्यसभा निवडणुकीत आमचाच व्हीप चालणार, आमचा उमेदवार विजयी होणार, असा दावाही त्यांनी केला. Dharmarao Baba Atram

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पक्ष कुणाचा यावरून घमासान सुरू आहे. आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून शरद पवार गट आक्रमक झालेला असून राज्यभरात भाजप व सरकारविरोधात घंटानाद, घोषणाबाजी, आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ईडी चौकशीला रोहित पवार यांनी सहकार्य करायला हवे, ईडीला आवश्यक असलेली माहिती मिळेपर्यंत ते चौकशी करणारच, असेही आत्राम म्हणाले. Dharmarao Baba Atram

शरद पवार हे क्रियाशील सदस्य नाहीत. आतापर्यंत ते स्वयंभू अध्यक्ष या पद्धतीनेच वागले. आम्ही देखील त्यांना परंपरेप्रमाणे विरोध केला नाही. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते आहेत. अजित पवार हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य असल्याने तेच आमचे नेते आहेत. शरद पवार प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य नसल्याने त्यांचा कुठलाही दावा करणे बरोबर नाही.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसींची बाजू मांडताना ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची व्यक्तिगत भूमिका ओबीसींमधून कोणालाही आरक्षण नको, अशी असली तरी राज्य सरकार म्हणून जे निर्णय घेतले जातात. ते राज्य मंत्रिमंडळाची एकत्रित, सामूहिक जबाबदारी असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र, भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button