Dr. Babanrao Taiwade | …तर ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करेल : डॉ. बबनराव तायवाडे | पुढारी

Dr. Babanrao Taiwade | ...तर ओबीसी समाजही मुंबईकडे कूच करेल : डॉ. बबनराव तायवाडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन ओबीसीतून आरक्षण दिल्यास ४०० जातींचा एकत्रित ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही. आम्ही पण मुंबईकडे कूच करू, असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. मनोज जरांगे- पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागणीनंतर गरीब ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. नवे वाटेकरी होतील, तर ओबीसींना आरक्षणात न्याय मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. Dr. Babanrao Taiwade

तायवाडे म्हणाले की, २२ दिवस वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केल्यावर सरकारने बैठक घेऊन आम्हाला आश्वासन दिले की, ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही. ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. सरकारने आश्वासन दिले असले तरी जे आंदोलन सुरू आहे, आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, असे आंदोलक सांगत आहेत. ५४ लाख नोंदी सापडल्या का? यावर सरकारने स्पष्टीकरण देऊन ओबीसींचे समाधान करावे. ५४ लाख नोंदी सापडल्या म्हणून मराठा समाज आनंदी आहे. मात्र, ओबीसी समाज दहशतीखाली आहे. ६ दिवसांत कितीही लोक वापरले, तरी सर्वेक्षण पूर्ण होणार नाही. Dr. Babanrao Taiwade

ज्या ५४ लाख नोंदी सापडल्या त्यांचे सर्वेक्षण करून कोणाकडे प्रमाणपत्र आहे, हे तपासले पाहिजे. सरकारने १३ कागदपत्रे ग्राह्य धरणार असल्याचे सांगितले आहे, त्यावर आक्षेप मागितले आहेत. त्याचा निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत राजपत्र काढता येणार नाही, याकडे तायवाडे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा 

Back to top button