Bhandara News: मुलीच्या लग्नास नकार देणाऱ्या पित्यावर हल्ला | पुढारी

Bhandara News: मुलीच्या लग्नास नकार देणाऱ्या पित्यावर हल्ला

भंडारा; पुढारी वृत्तसेवा: मुलीचे वय कमी असल्याने तिच्या लग्नाला नकार देणाऱ्या पित्यावर चार जणांनी हल्ला करुन जखमी केले. ही घटना शहरानजिकच्या बैलबाजार येथे घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हुरहुरसिंग राजपूत (रा. पटेरा, जि.कटनी) असे मुलीच्या जखमी वडीलाचे नाव आहे. ते व त्यांचे कुटूंबिय बैलबाजार परिसरात रुद्राक्ष विकण्याचा व्यवसाय करतात. (Bhandara News)

ही घटना घडली त्यादिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपी कंठीलाल अय्या पवार (५०), बादशाह कंठीलाल पवार (२२), जोमसलाल कंठीलाल पवार (२४), अनसुर कंठीलाल पवार (३०) चौघेही (रा. पटेरा, जि.कटनी) मुलीच्या  घरी आले. यावेळी तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत करा, असे त्यांनी म्हटले. यावर हुरहुरसिंग यांनी माझ्या मुलीचे वय कमी असल्याने आम्ही लग्न करणार नाही, असे सांगितले. यावरुन आरोपींनी भांडण केले आणि शिवीगाळ करुन निघून गेले. (Bhandara News)

थोड्या वेळानंतर आरोपी पुन्हा त्यांच्या घरी आले व शिवीगाळ सुरू केली. त्यातील कंठीलाल पवार याने हुरहुरसिंग यांच्या डोक्यावर बांबुच्या काठीने हल्ला करुन जखमी केले. याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Bhandara News)

Back to top button