Nitin Gadkari: नितीन गडकरींनी नव्‍या वर्षात दिली नवी दिशा : खा. रामदास तडस | पुढारी

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी नव्‍या वर्षात दिली नवी दिशा : खा. रामदास तडस

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रीडा महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून विदर्भातील चांगल्‍या खेळाडूंनी समोर आणले असून आता संपूर्ण देशात क्रीडा महोत्‍सवांचे आयोजन केले जात आहे. आता त्‍यांनी ‘खासदार औद्यागिक महोत्‍सव-ऍडव्‍हांटेज विदर्भ’च्‍या माध्‍यमातून विदर्भातील उद्योगांना प्रोत्‍साह‍ित करण्‍याचे महत्‍वाचे पाऊल उचलले आहे. नवीन वर्षात त्‍यांनी उद्योगांना या माध्‍यमातून नवी दिशा दिली असून त्‍यामुळे विदर्भात उद्योजक आणि युवकांमध्‍ये नवी चेतना निर्माण होईल, असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्‍यक्‍त केला. Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍या वतीने येत्‍या 27 ते 29 जानेवारी दरम्‍यान ‘खासदार औद्योग‍िक महोत्‍सव ऍडव्‍हांटेज विदर्भ’ चे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात आयोजन होणार असून या महोत्‍सवाच्‍या स्‍थळाचे भूमिपूजन बुधवारी पार पडले. Nitin Gadkari

याप्रसंगी गडचिरोलीचे खा. अशोक नेते, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. मोहन मते यांच्यासह वर्ल्‍ड ट्रेड सेंटरचे अनुप खंडेलवाल, बैद्यनाथचे सुरेश शर्मा, शारदा इस्‍पात लि. चे नंदक‍िशोर सारडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी महापौर कल्‍पना पांडे, गोविंद देहडकर यांच्‍यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्‍यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

खा. तडस म्‍हणाले, अशा औद्योगिक महोत्‍सवांची देशाला अधिक गरज असून त्‍यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि देशाची भरभराट होईल. खा. अशोक नेते यांनी गडचिरोली ज‍िल्‍ह्यात नैसर्गिक साधनसंपत्‍ती मुबलक प्रमाणात असून केवळ पायाभूत सुविधांच्‍या अभावामुळे येथे उद्योग येऊ शकले नाही, अशी खंत व्‍यक्‍त करताना याचा लाभ गडचिरोली जिल्‍ह्याला म‍िळेल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. खा. कृपाल तुमाने यांनी विदर्भात मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढली तर उद्योग वाढतील आणि परिणामस्‍वरूप बेरोजगार युवकांच्‍या हाताला काम म‍िळेल असे सांगितले. डॉ. सुभाष चौधरी यांनी अध्‍यक्षीय भाषणातून नागपूर विद्यापीठाद्वारे कौशल्‍य विकासासाठी राबविण्‍यात येणा-या विविध प्रशिक्षणांची माहि‍ती दिली. एडचे अध्‍यक्ष आशीष काळे यांनी प्रास्‍ताविकातून इंडस्ट्रियल एक्‍स्‍पो, बिझनेस आणि इन्‍व्‍हेस्‍टमेंट कॉन्‍क्‍लेव्‍हची माह‍िती दिली. सूत्रसंचालन सचिव डॉ. विजय शर्मा यांनी केले. राजेश बागडी यांनी आभार मानले.

उपाध्‍यक्ष प्रणव शर्मा व गिरधारी मंत्री, सदस्‍य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ. महेंद्र क्षिरसागर, प्रदीप माहेश्‍वरी, प्रशांत उगेमुगे व रवींद्र बोरटकर यांचे सहकार्य लाभत आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला गगन सियाल, प्रणव शर्मा, वैभव शिंपी, विनोद तांबी, क‍िशोर ठुठेजा, आर्कि. सुनील जोशी, धर्मेश वेद, डॉ. प्रोणव नगरनाईक, महेश साधवानी, शेखर पडगीलवार, दुष्‍यंत देशपांडे, मनोहर भोजवानी, डॉ. प्रकाश मालगावे, संदीप गोएंका, मोहन श्रीगिरीवार, मनोज गाएंका, आशीष दोषी, प्रतिक तापडिया, पी. मोहन, डॉ. झुल्‍फेश शहा, अनिल मानापुरे व धर्मेश वेद उपस्थित होते.

विविध औद्योग‍िक संघटनांचा सहभाग

वर्ल्‍ड ट्रेड सेंटर हे खासदार औद्योग‍िक महोत्‍सव – अॅडव्‍हांटेज विदर्भचे प्रमुख प्रायोजक असून आयआयएम नागपूर सहप्रायोजक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे नॉलेज पार्टनर आहेत. एमएसएमई, एमआयडीसी आणि एमएडीसी यांचे आयोजनासाठी सहकार्य लाभत आहे. व्‍हीआयए, बीएमए, एमआयए, सीओएसआयए, व्‍हीपीआयए, इलेक्‍ट्रीकल असोसिएशन, एफआयए, वेद, व्‍हीडीआयएच, व्‍हीएडीए, म‍िहान इंडस्‍ट्रीज असोसिएशन, टीआयई नागपूर, व्‍हीसीसीआय अकोला, एआयआरईए, एमगिरी, लघू उद्योग भारती, एआयए, क्रेडाई, जेजेई, सीए असोसिएशन, एसएमए, विदर्भ ड‍िफेन्‍स इंडस्‍ट्रीयल असोस‍िएशन, व्‍हीएडीए, एमसीडीसी, क्रेडाई या औद्योग‍िक संघटनांचा आयोजनात सहभाग आहे.

हेही वाचा 

Back to top button