ED Notice : खासदार भावना गवळींना ईडीचा तिसरा समन्स | पुढारी

ED Notice : खासदार भावना गवळींना ईडीचा तिसरा समन्स

वाशिम; पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने तिसरे समन्स (ED Notice) बजावले आहे. भावना गवळी यांना 24 नोव्हेंबरला ईडीकडून कार्यालयात हजर राहण्यास या समन्सद्वारे सांगण्यात आले आहे.

ईडीने भावना गवळी यांना यापूर्वी दोन समन्स पाठवले होते. मात्र, त्यावेळी भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नव्हत्या. खासदार भावना गवळी यांना ईडीचा तिसरा समन्स (ED Notice) आल्याने त्या यावेळी चौकशीला सामोरं जाणार की, नाही ? असा प्रश्न सद्या उपस्थित झाला आहे.

तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी हजर राहणार का?

भावना गवळी यांना ईडीनं यापूर्वी दोन समन्स पाठवली होती. दुसऱ्या समन्सनुसार 4 ऑक्टोबरला भावना गवळींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तब्येतीचे कारण देत भावना गवळी या चौकशीला हजर राहिल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर खासदार भावना गवळी चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button