

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर आज (दि.२५) वंचित बहुजन आघाडीची स्त्री मुक्ती परिषद सुरू असताना व्यासपीठाचा बॅक ड्रॉप लोखंडी अँगलसह मागच्या बाजूने कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेला नाही. मोठा अनर्थ टळला.
विशेष म्हणजे जेव्हा हा बॅकड्रॉप कोसळला, तेव्हा अॅड. प्रकाश आंबेडकर व्यासपीठावर यायचे होते. मात्र, संपूर्ण बॅकड्रॉप लोखंडी अँगलसह मागे कोसळल्यामुळे सभास्थानी काही काळासाठी खळबळ माजली. धक्कादायक बाब म्हणजे हजारोंच्या गर्दीत, सर्वांच्या उपस्थितीत बॅकड्रॉप कोसळल्यानंतर तिथे उपस्थित मीडियाकर्मी, फोटोग्राफर जेव्हा व्यासपीठाच्या मागे जाऊन घटनेचे फोटो घेण्याचे, चित्रीकरण करण्याचे प्रयत्न करत होते. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा, धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तापले.
हेही वाचा