

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सिव्हिल लाईन्स परिसरातील जुन्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या समोर बिशप ग्राउंडच्या बाजूला रस्त्याशेजारी फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. लहान मुलांसह तिघेजण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालय येथे आणले.
नाव सिझन आसिफ शेख (दि ४ वर्षे), फारिया हबीब शेख, (वय २८ वर्षे), अनमता हबीब शेख (वय 24 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व राहणार मानकापूर मोहम्मद मज्जिद येथील आहेत. फुगेवाल्याचा पोलीस शोध घेत आहेत. प्रत्यक्षदर्शी कुणी नसल्याने या घटनेबाबत उलटसुलट चर्चा होती. फुगा घेण्यासाठी कारमधून उतरल्यावर ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.