अमरावती कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी | पुढारी

अमरावती कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या कारागृहात बंदिस्त असलेल्या पुणे व अमरावती येथील दोन कैद्यांचे काही कारणावरून एकमेकांशी भांडण होऊन दोघांमध्ये हाणामारी झाले.

या घटनेची माहिती मिळताच एसीपी कैलाश पुंडकर यांच्यासह फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव फौजफाट्यासह मध्यवर्ती कारागृहात पोहोचले. या संपूर्ण प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून माहिती घेतांना कारागृहात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात आले. मात्र, वृत्त लिहेपर्यंत या घटनेबाबत फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात अधिकृतरीत्या गुन्हा दाखल झाला नव्हता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Back to top button