Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे वेडे राजकारणी: खा. कृपाल तुमाने | पुढारी

Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे वेडे राजकारणी: खा. कृपाल तुमाने

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले, तर त्या ट्विटकडे बघण्याची गरजच नसते. हे आता महाराष्ट्रातील जनतेला देखील माहित आहे. मुळात संजय राऊत हे वेडे राजकारणी म्हणून ओळखले जातात, असे टीकास्त्र शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज (दि.२१) माध्यमांशी बोलताना सोडले. Sanjay Raut

शिंदे गटातील खासदारांचे तिकीट कापणार या चर्चेत अर्थ नसून शिंदे गटातील सर्व १३ खासदार आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. Sanjay Raut

खासदार तुमाने म्हणाले की, एखाद्याच्या वैयक्तिक जीवनावर टीका करायची नसते. बावनकुळे एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेले आणि बाजूला केसिनो असेल. अशावेळी त्यांच्या फोटोचा वापर करायचा आणि ट्विट करायचे, हे शुद्ध मूर्खपणा आहे. राऊत यांनी अशी कामे न करता चांगली कामे करावी. राजकारणाची पातळी घसरत आहे, हे खरे आहे. पण राऊत यांच्यासारखे वैफल्यग्रस्त प्रवक्ते एखाद्या पक्षाकडे असेल, तर राजकारणातील पातळी अधिकच घसरेल, यात कुठेच शंका नाही, यावर तुमाने यांनी भर दिला.

हेही वाचा 

Back to top button