

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : वेळ सायंकाळची… चिमुकल्या मुलाने आईजवळ खाऊची मागणी केली… चिमुकल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई बाळाला घेऊन स्कुटीवरून त्याला घेऊन निघाली… पुलावरून जाताना वाहनावरील नियंत्रण सुटले… आई चार वर्षाच्या बाळासह नदीत पडली…डोक्याच्या भारावर चिखलात पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला… सुदैवाने मात्र चिमुकला बचावला…देह सोडून गेलेल्या आईच्या मायेसाठी चिमुकला रात्रभर मृतदेहाजवळ ढसा ढसा रडत राहिला. हृदयाला पाझर फोडणारी ही घटना बल्लारपूर राजूरा मार्गावरील बाम्हणी जवळील वर्धानदीच्या पुलाखाली घडली. गुरूवारी (दि. १९) सकाळी ही घटना समोर आली. सुषमा पवन काकडे (वय 29) असे मृत महिलेचे नाव आहे. तर चार वर्षाच्या दिवेन्श याला पोलिसांनी रूग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे. (Chandrapur News)
हेही वाचा