MLA Pratibha Dhanorkar : थोर महिलांच्या कार्याच्या स्मरणाने नवीन पिढीला दिशा मिळेल: आमदार प्रतिभा धानोरकर | पुढारी

MLA Pratibha Dhanorkar : थोर महिलांच्या कार्याच्या स्मरणाने नवीन पिढीला दिशा मिळेल: आमदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  महिलांनी सक्षम होऊन स्वबळावर उभे राहण्याची गरज आहे. नवरात्र उत्सवातून थोर महिलांच्या कार्याचे स्मरण करण्याची संकल्पना समाजातील नवीन पिढीला दिशा देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. येथील नानाजी नगरात महिला मंडळातर्फे वुमेन्स पॉवर दांडियाचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन केले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमुख, माजी नगरसेविका अनुराधा हजारे, जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, मनीषा बोबडे यांची उपस्थिती होती. MLA Pratibha Dhanorkar

या दांडियामध्ये नऊ दिवस राजमाता जिजाऊ, महाराणी हिराई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,आद्य शिक्षिका फातिमा शेख, प्रथम वैद्यकीय चिकित्सक रख्माबाई राऊत, माता रमाई भिमराव आंबेडकर व मदर टेरेसा आदी 9 थोर स्त्रियांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 महिलांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येईल.  MLA Pratibha Dhanorkar

उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच विधानसभेत जनसामान्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार धानोरकर यांचा साडी-चोळी देऊन सत्कार केला.

संस्कृती गावंडे या मुलीने जिजाऊची वेशभूषा परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व राजमाता जिजाऊ च्या कार्याचे वाचन माधुरी शास्त्रकार तर  नंदू पाहुणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नानाजी नगर महिला मंडळाच्या शुभांगी गावंडे, संगीता पाहुणे, मनिषा गावंडे, संगीता वानखडे, अलका लांडे, जयश्री लांडे, प्रविण बरडे, वैशाली हिवरकर, साधना शेंडे, सपना राणा, कविता भांदककर यांनी सहकार्य केले.

हेही वाचा

Back to top button