चंद्रपूर : मूल येथील महिला दुय्यम निबंधकास लाच घेताना अटक | पुढारी

चंद्रपूर : मूल येथील महिला दुय्यम निबंधकास लाच घेताना अटक

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरिता पंधरा हजार रुपये मागणाऱ्या दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मूल येथे (गुरूवार) सांयकाळी ही कारवाई करण्यात आली. वैशाली मिटकरी असे महिला दुय्यम निबंधकाचे नाव आहे.

तक्रारदार मूल येथे दस्तलेखनाचे काम करतात. तक्रारदार यांच्या पक्षकाराची शेत जमीन फेरफार करायची होती. तक्रारदार यांनी दस्त तपासणी व शेत जमिनीचे मूल्यांकन काढून दस्ताची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता, दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांनी दस्त नोंदणीचे काम करून देण्याकरिता गैर अर्जदार यांना शासकीय शुल्का व्यतिरिक्त पंधरा हजार रुपयाची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदाराने लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांना भेटून तक्रार दाखल केली.

सदर तक्रारीची पडताळणी करून (गुरूवार) सायंकाळी लाचलुचपत विभगाने सापळा रचला. यामध्ये महिला दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांनी शेतीचे दस्त नोंदणी करण्याच्या कामाकरिता तळजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच घेताना त्‍यांना रंगेहात पकडण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button