Gopichand Padalkar: धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar: धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: गोपीचंद पडळकर
वर्धा,  पुढारी वृत्तसेवा :  धनगर समाजाला आरक्षण मिळून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. शहर, गावांमध्ये पोहोचून समाजाला एकत्रित करण्याचे काम आपण करणार आहोत. हे काम माझे एकट्याचे नसून आपण सर्वांची साथ आरक्षण मिळवून देण्याकरीता असायला पाहिजे, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. (Gopichand Padalkar)
देवळी येथील चंद्रकोशल्या सभागृहात धनगर जागर यात्रेनिमित्त जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, बीडचे शिवदास बिडगर, पं.स.चे माजी सभापती विद्या भुजाडे, सुधाकर गोरडे, अरुण लाभाळे, दशरथ भुजाडे, गजानन दुतारे, सुनील उपासे यांची उपस्थिती होती. (Gopichand Padalkar)
यावेळी आमदार पडळकर म्हणाले की, आदिवासींच्या ३३ जमाती धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहे. मात्र, मूठभर लोक या आरक्षण मागणीला विरोध करत आहे. या आरक्षणाला सरकार सकारात्मक असून या मागणीकरीता आपण यात्रेचा पहिला टप्पा संपल्यावर तालुका स्तरावर धनगर समाजाचे मेळावे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पुढे संपर्क अभियान राबविणार असल्याचेही आमदार पडळकर यांनी सांगितले.
यावेळी खासदार तडस यांनीही समयोचीत विचार व्यक्त केले. प्रास्ताविक दशरथ भुजाडे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली नवले यांनी केले. सुनील उपासे यांनी आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news