ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण द्या - विजय वड्डेटीवार | पुढारी

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण द्या - विजय वड्डेटीवार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – मराठा समाजाच्या आजच्या सभेतील मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य लक्षात घेता आता सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे, असे प्रतिपादन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केले. वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाने सरकारला दिलेल्या मुदतीतील दहा दिवस शिल्लक आहेत.

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता आरक्षण द्यावं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची फसवणूक केली असल्याचे आजच्या सभेतून स्पष्ट झालं आहे.

Back to top button