चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीचा मृत्यू; वनविभागात खळबळ

 हत्तीचा मृत्यू
हत्तीचा मृत्यू

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात चितकी गावालगत शेतात एका हत्तीचा मृतदेह आज (मंगळवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. काही लोकांना हत्ती मृत्तावस्थेत दिसून आला. त्यांनतर वनविभागाला माहिती देण्यात आली.

आज (मंगळवार) सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील चितकी गावालगत काही नागरीकांना मृताअवस्थेत जंगली हत्ती आढळून आला. त्यानंतर सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. लगेच घटनास्थळी वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी आपल्या चमुसह दाखल झाले. तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता. महिनाभरापासून एक हत्ती सिंदेवाही तालुक्यातील शेत शिवारात धुडगूस घालत होता. तेव्हा पासून वनविभागाची त्या हत्तीवर पाळत होती. परंतू आज अचानक हत्तीचा चितकी गावलगतच्या शेतात मृत्तदेह मिळाला. हत्तीचा मृत्यू कशामुळे झाला, या बाबतची माहिती वन विभागाकडून मिळाली नाही. हत्तीचा मृत्यू कशामुळे झाला या बाबत तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news