नागपूर विमानतळावर ८७ लाखांचे सोने जप्त, दोघांना अटक | पुढारी

नागपूर विमानतळावर ८७ लाखांचे सोने जप्त, दोघांना अटक

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपुरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा आखाती देशातून सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. कस्टम विभागाने कतारवरून आलेल्या दोघांना नागपूर विमानतळावर अटक करुन त्यांच्याकडून ८७ लाखांचे हे बेहिशोबी सोने जप्त केले आहे. मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी या अटक केलेल्या तस्करांची नावे असून ते मुळचे कर्नाटकमधील असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबतची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारावर बुधवारी (दि. २०) रोजी पहाटे ही कारवाई कण्यात आली. कतारमधून आलेल्या विमानातून हे दोघे नागपुरात आले होते. दोघांची तपासणी करण्यात आली असता त्यांनी घातलेल्या कपड्यांमध्ये सुमारे पावणे दोन किलो ( ८७ लाख रूपये) सोनं पेस्ट स्वरूपामध्ये लपवून ठेवल्याचं आढळून आलं. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अलीकडे पेस्ट स्वरूपात सोने कपड्यात लपवून आणण्याचा तस्करांचा ट्रेंड सुरू आहे. कस्टम विभागाचे अधिकारी या दोघांच्या सीडीआरची तपासणी करत असून त्याद्वारे पुढचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अलिकडेच पुणे विमानतळावर देखील एका महिलेकडून सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा : 

Back to top button