नागपूर: विदर्भवादी कार्यकर्त्यांचा आमदारांना घेराव, भाजप नेत्यांच्या पत्राची होळी | पुढारी

नागपूर: विदर्भवादी कार्यकर्त्यांचा आमदारांना घेराव, भाजप नेत्यांच्या पत्राची होळी

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: स्वतंत्र विदर्भाची मागणी करत जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्त्यांनी विदर्भातील सर्व आमदारांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने बुधवारी (दि.१३) पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरावर आज जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्त्यांना घेराव घालण्यास जाताना पोलिसांनी त्यांना रोखले.

यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 2010 मध्ये जे स्वतंत्र विदर्भाबाबत जे पत्र लिहून दिले होते. त्या पत्राची आज भर रस्त्यात होळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व जय विदर्भ पार्टीचे युवा अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केले.

हेही वाचा 

Back to top button