BJP Vs Thackeray: भाजप कार्यकर्त्यांचा संयम सुटू शकतो!; बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule
नागपूर; पुढारी वृत्तसेवा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप नेत्यांवर वारंवार टीका करत असतात. या टिकेमुळे भाजप कार्यकर्ते त्यांचा संयम कधी सोडतील सांगता येत नाही, असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि.११ सप्टेंबर) दिला. काल (दि.१० सप्टेंबर) जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची वचनपूर्ती सभा झाली. या सभेदरम्यान ठाकरे यांनी हिंदू धर्म आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना इशारा दिला आहे. (BJP Vs Thackeray)
माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळू लागले असून, ते आता राजकारणाच्या मर्यादा देखील पाळू शकत नाहीत. त्यांची भाषा राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविणारी आहे. यापूर्वीही त्यांना याबाबत सूचित केले आहे. मात्र वारंवार त्यांची भाषा वाईट होत चालली आहे. (BJP Vs Thackeray)
राज्यात शांतता रहावी ही आमची इच्छा आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बाधित करण्याचे ठरविले आहे, असे सांगून  बावनकळे म्हणाले, कुणबी-मराठा हे भावासारखे राहतात. त्यामुळे दोन भावांत वाद निर्माण करणे चुकीचे आहे. याबाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेईल. मुळात उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना विकासाची चर्चा करायचीच नाही, केवळ आरोप करायचे आहेत. काँग्रेसचे जनतेत  संभ्रम निर्माण करणे हेच त्यांचे काम आहे. त्यांना जनता धडा शिकवेल.

BJP Vs Thackeray: राहुल गांधींचे विदेश दौरे संशोधनाचा विषय

 दरम्यान, राहुल गांधी दर महिन्याला विदेशात का जातात, हा संशोधनाचा विषय आहे. पुढच्या वेळी विदेश दौऱ्यावर जातील, तेव्हा त्यांनी त्यांच्या विदेश दौऱ्याविषयी १४० कोटी भारतीयांना माहिती द्यावी, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news