मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचे निषेधार्थ वाशिम कडकडीत बंद! | पुढारी

मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचे निषेधार्थ वाशिम कडकडीत बंद!

वाशिम : पुढारी वृत्‍तसेवा :  वाशिम येथे मंगळवारी सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये समविचारी सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्ष या आंदोलनात सहभागी झालेत. जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या अमानुस लाठीचार्जच्या निषेधार्थ वाशिम बंदचे आवाहन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात येऊन त्यांचे दहन करण्यात आले. तसेच यावेळी मुंडन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . यावेळी आमदार अमित झनक सह विविध पक्षाचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. अंतरवाली( सराटी) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या व त्यासाठी जमा झालेल्या मराठा समाज बांधव महिला आणि लहान मुले तसेच आंदोलन कर्त्यावर निर्दयपणे पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्या घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने विविध सामाजिक संघटनाच्या व विविध राजकीय पक्षाच्यावतीने मंगळवारी वाशिम बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या बंदला सर्व सामाजिक स्तरातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला असून व्यापारी बांधवांनी देखील स्वयंपूर्ण व उत्स्फूर्तपणे प्रतिष्ठान बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शहरातील विविध शिक्षण संस्था चालकांनी आपापली शाळा महाविद्यालय सुद्धा बंद ठेवून या आंदोलनाला सहकार्य केले. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व स्तरातून वाशिम बंदला पूर्णतः सहभाग मिळाला मंगळवारी सकाळी सकल मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्त्यांनी रविवार बाजारातील पाटणी चौक येथे एकत्र जमून तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले. व तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार अमित झनक व मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नारायण काळबांडे, व मोर्चाचे समन्वयकानी हार अर्पण केले. यावेळी आंदोलनाची रूपरेषा संभाजी ब्रिगेड विभागिय अध्यक्ष गजानन भोयर यांनी मांडली.

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनापक्ष जिल्हाप्रमुख डॉ.सुधीर कवर,कॅप्टन प्रशांत पाटील सुर्वे,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष शंकरराव वानखेडे,समाज सेवक मो. मुस्तफाभाई,सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे,इम्पा जिल्हा अध्यक्ष डॉ.रवी जाधव,जिजाऊ ब्रिगेड विभगीय अध्यक्ष संजीवनी बाजड, कार्यध्यक्ष सुरेखा आरु,रा. का.माजी जिल्हा भगवान् राव गोटे, साबीर मिर्झा,मनसे जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे आदींनी निषेध व्यक्त केला.

आभार सत्यशोधक समाजाचे विभागीय सचिव प्रल्हाद पाटील पौळकर यांनी आभार मानले.यानंतर ह्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ऊपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली व दहन करून या प्रसंगी भगवान वाकुडकर ह्या कार्यकर्ते नी मुंडण केले. प्रतिकात्मकपने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.व निषेध व्यक्त केला.

 

Back to top button