वाशीम : शेतकऱ्याने पिकावर प्रादुर्भाव झाल्याने सात एकरातील उभे पीक केले नष्ट | पुढारी

वाशीम : शेतकऱ्याने पिकावर प्रादुर्भाव झाल्याने सात एकरातील उभे पीक केले नष्ट

वाशीम : पुढारी वृत्तसेवा – वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगावच्या परिसरातील सोयाबीन पिकावर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतातील संपूर्ण पिक ट्रॅक्टर फिरवून नष्ट केले आहे.

ज्ञानेश्वर कावरे या शेतकऱ्याला उशिरा आलेल्या पावसामुळे तिबार पेरणी करावी लागली होती. त्यातच आता सोयाबीन पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उद्विग्न होत या शेतकऱ्याने सात एकर सोयाबीन पिकांवर रोटावेटर फिरवला.

सोयाबीन हे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकमेव महत्त्वाचं पीक आहे. शेतकऱ्यांवर आता मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने यासंदर्भात मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Back to top button