राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी जाहीर, अनिल देशमुखांकडे विदर्भातील सहा जिल्हे | पुढारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी जाहीर, अनिल देशमुखांकडे विदर्भातील सहा जिल्हे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या प्रभागांची नियुक्ती केली. यात विदर्भातील दहा पैकी सहा जिल्ह्यांचा पदभार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे तर गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सुनील भुसारा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आमदार रोहित पवार यांना प्रथमच पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने विदर्भात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे जिल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे जिल्हे असल्याने अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटातर्फे राष्ट्रवादीचे विदर्भात शक्तिप्रदर्शन येणाऱ्या काळात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button