नागपूर : अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे : विजय वडेट्टीवार | पुढारी

नागपूर : अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचा विरोधी पक्ष नेता आणि ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रातील अनेक आव्हानांना सामोरे जायचं आहे. १४ कोटी लोकांचे हित जपत, २०२४ ची निवडणूक लढण्याची जिद्द, परिवर्तन करण्याची जिद्द ठेवून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार असल्याचा निर्धार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.९) नागपुरात व्यक्त केला.

माध्‍यमांशी बाोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मोठ-मोठ्या विकासाच्या कल्पना करणाऱ्या मोदी सरकारने मागील दहा वर्ष आरोपच करण्याचे काम केले आहे. किती वर्ष सत्ता टिकवण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणार. दहा वर्ष सत्तेत राहून जर तुम्हाला २६ पक्षाचा आधार घ्यावा लागत असेल तर यातच तुमचा पराभव आहे. जनतेच्या आश्वासनाचा तुम्हाला विसर पडला आहे. त्यामुळे जनता तुम्हाला नाकारत आहे.”

 लोकसभेच्या निवडणूकीसाठी कमी कालावधी राहिला आहे. कमी कालावधीत निवडणुका घेणे. या निर्णयाचे मी समर्थन करतो. आमदार बच्चू कडू यांचा निर्णय चुकलेला आहे. कोणी त्यांच ऐकत नाही. हे त्यांना आता कळून चुकल आहे. त्यामुळे ते योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असे वाटते, असेही त्‍यांनी नमूद केले.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सुरू ठेवायची आहे. त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. सोबत असणाऱ्या शिंदे गटातील आणि भाजपमधील मोठे नेते नाराज आहेत. पुन्हा महानाट्य होऊ नये म्हणूनच मंत्रिमंडळ विस्ताराच्या बावड्या उठवल्या जातात. असेही ते म्‍हणाले.  मुख्यमंत्र्यांच्या भोजनाला आमचे आमदार जाण्याचा प्रश्नच नाही. कदाचित तो निरोप समारंभाचे डिनर असू शकतो. असे चित्र सध्याच्या परिस्थितीतून दिसत आहे असा चिमटाही वडेट्टीवार यांनी काढला.

ज्येष्ठ विचारवंत प्रा हरी नरके ओबीसी विचाराचे मोठे पुरस्कर्ते होते. ओबीसीच्या जनगणनेसाठी आणि हक्कासाठी अनेक वर्ष लढवय्या म्हणून त्यांनी काम केले. आज ते आपल्यातून हरवल्याचं दुःख आहे. ती पोकळी कधीही भरून निघणार नाही. ओबीसी जनतेला जागृत करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं,अशी शोकसंवेदना वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा;

Back to top button