Nitin Gadkari On Sharad Pawar : शरद पवार म्हणजे जपानी गुडिया!: नितीन गडकरींचा टोला
नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्यक्तीमत्व म्हणजे जपानी गुडियासारखेच आहे. प्रत्येकाला वाटते की, ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे',कामाला लागा, पण तिकीट भलत्यालाच मिळते, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना टोला लगावला. पूर्वी पानठेल्यावर अशी जपानी गुडीया असायची, ती बघून प्रत्येकाला वाटायचे की ती आपल्याकडेच बघतेय, असे गडकरी (Nitin Gadkari On Sharad Pawar) यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या पद्ग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यात ते (Nitin Gadkari On Sharad Pawar) बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रभारी चैनसुख संचेती, आजी- माजी आमदार, पदाधिकारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात गडकरींनी अनेकांना 'कही पे निशाणा काही पे निगाहे' शैलीत चिमटे काढत कार्यकर्त्यांचे मनोरंजन केले.
गडकरी म्हणाले 'जपानी गुडिया' जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते. तसेच काहीसे शरद पवार यांचे आहे. समोर बसणाऱ्या कार्यकर्त्याला असेच वाटते. साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळते, अशा शब्दांत मंत्री गडकरी यांनी पवार यांना टोला लगावला.
Nitin Gadkari On Sharad Pawar गडकरी म्हणाले अनेकजण सालाम
मै तो साहब बन गया, कैसे तन गया….असे वागतात. पद हे तात्पुरते आहे. काही नेते असे असतात, जे पदावर गेल्यावर मान सन्मान प्रतिष्ठा मिळते… पण काही कार्यकर्ते असे असतात ज्यांना जनतेचे प्रेमही मिळतं, प्रतिष्ठाही मिळते.
आपण अनके उन्हाळे, पावसाळे बघितले. कार्यकर्त्याप्रमाणे जनता हुशार आहे. व्यक्ती जेव्हा पदावर असते, तेव्हा चंद्रशेखर बावनकुळेचा बावनकुळे साहेब होते..लोक हुशार आहे… जेव्हा मंत्री बनतो तेव्हा काही लोक प्रेम करणारे असतात काही लोक मंत्रीपदावर प्रेम करणारे असतात. शेवटी नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणूनच सांगतो चांगलं मिळण्याची अपेक्षा करा, पण नाही मिळाले, तर दुःख नाही, अशा पद्धतीने जगत कामाचा आनंद घेत रहा.
आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सांगतात ते प्रयोग मी अध्यक्ष असताना करून चुकलो….ही आघाडी ती आघाडी…आपल्याकडे चॉकलेट वाटण्याची फॅक्टरीच आहे ना. १०० पदाधिकारी ४० सेक्रेटरी हे मी सगळं करून चुकलो आहे. खूप आघाड्या तयार केल्यात.. चांगली मूर्ती तयार करायला गेलो मात्र हातात तेव्हा गधा आला. पहिलेच तीन-तीन पार्टी असताना कोणाला कोणती सीट भेटेल याचेही काही खरं नाही असे सांगत त्यांनी भविष्याची चाहूल बावनकुळे यांना करून दिली.
हेही वाचा

