Back and Neck Pain : पाठ आणि मानेचे विकार, जाणून घ्‍या आयुर्वेदिक उपचार | पुढारी

Back and Neck Pain : पाठ आणि मानेचे विकार, जाणून घ्‍या आयुर्वेदिक उपचार

वैद्य विनायक खडीवाले

मान आणि मणक्यात कमी अधिक अंतर आले असता रक्तवाहिन्यांवर दाब पडून विलक्षण वेदना, बोटांना मुंग्या येणे, कष्टाने हालचाल होणे हे त्रास होतात. दोन मणक्यातील नाजूक आवरणाची झीज झाल्यामुळे थोडीही हालचाल त्रासदायक होते. अशा अवस्थेत लेप गोळ्या चार-सहा घ्याव्या. थोड्या पाण्यात भिजत टाकाव्या. थोड्या वेळाने पाट्यावर वाटाव्या. पळीत गरम कराव्या चटका बसेल असा दाट आणि गरम लेप लावावा आराम पडतो. (Back and Neck Pain)

रात्री झोपताना आणि सकाळी अंघोळीचे अगोदर बलदायी महानारायण तेलाचे हलक्या हाताने मसाज करावे. जोर देऊ नये, त्याने बरे वाटले नाही तर गवती चहाचा अर्क मिसळून घ्यावा. सिंहनादगुग्गुळ, लाक्षादि, गोक्षुरादि त्रिफळागुगुळ आणि संधिवातारी गुग्गुळ प्रत्येकी दोन गोळ्या बारीक करून सकाळ-संध्याकाळ जेवणाअगोदर पाण्याबरोबर घ्याव्या. सिंहनादगुग्गुळ उष्ण आहे. पांडुता असणान्यांनी चंद्रप्रभा घ्यावी. पोट साफ होत नसल्यास आरोग्यवर्धिनी घ्यावी. कोट्याच्या मानाने गंधर्वहरीतकी किंवा त्रिफळाचूर्ण घ्यावे. कडक अंधरुण, फळी, दिवाण, ब्लॅकेट, कांबळवर झोपावे.

ग्रंथोक्त उपचार :

सिंहनादगुग्गुळ, गोधरादिगुग्गुळ, चंद्रप्रभा, लाक्षादिगुगुळ,

महानारायण तेल :

विशेष दक्षता आणि विहार कोणतेही अतिरेकी काम करू नये. फार वजन उचलू नये. झटक्याने काम करणे, जोरात घाईत चालणे टाळावे, मागील १८० अंशांत मानेची हालचाल करावी.

पथ्य :

एरंडेल तेल मोहन म्हणून पोळीस एक चमचा या प्रमाणात घालून त्या पोळ्या खाव्या. पुदीना, आले, लसूण अशी चटणी, ताजे आणि गरम जेवण, दोन घास कमी जेवावे. सायंकाळी लवकर जेवावे.

Back and Neck Pain : कुपथ्य 

थंड पदार्थ, दही, केळे, शिकरण, बर्फ, वजन वाढेल असे मिठाई, फरसाण, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, कडधान्ये, गहू, मीठ, पापड, अंडी,

योग आणि व्यायाम :

मानेच्या मागच्या भागात १८० अंशांत मान फिरवून व्यायाम करावे.

रुग्णालयीन उपचार :

दुखणाऱ्या नेमक्या भागावर लेपगोळीचा दाट आणि गरम लेप.

अन्य उपक्रम (पंचकर्मादि) :

मणके न दुखवता हलक्या हाताने अभ्यंग आणि नंतर योग्य शेक

या रूग्णांनी स्थौल्य, मलावरोध, अतिरेकी कफ, टाइपिंग, लिखाण काम, लघवी कमी होणे, रक्तदाबवृद्धी या कारणांचा शोध घ्यावा. सिंहनाद प्रभावी पण गरम औषध आहे.

हेही वाचा : 

Back to top button