नागपूर : ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत, डुलकीनेच केला घात | पुढारी

नागपूर : ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत, डुलकीनेच केला घात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे लक्झरी बसचा भीषण अपघात घडला. त्या बस चालकाचे रक्त नमुने घेण्यात आले होते. या अहवालात तो बस चालक 0.030 टक्के मद्यधुंद अवस्थेत होता, असा अहवाल फॉरेन्सिक विभाग नागपूरने दिला आहे. हा अपघात इतका मोठा होता की, यामध्ये 25 निरपराधांना आपला जीव गमावला होता. याविषयीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.

दरम्यान, लक्झरी बसचा भीषण अपघात, हा टायर फुटून नाही, तर रोड हिप्नोसिसमध्ये चालकाला डुलकी लागून झाल्याचा दावा प्रादेशिक परिवहन विभागाने केला आहे.1 जुलैला समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर हा अपघात नेमका कसा झाला या यासंदर्भात विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते. लक्झरी बसच्या चालकाने सदर अपघात हा बसचे टायर फुटल्याने झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. मात्र, या संदर्भात अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने, आपल्या प्राथमिक अहवालात सदर बसचालकाचा दावा खोडून काढला आहे.

चालक मद्यधुंद असल्याचेही फॉरेन्सिक अहवालात पुढे आल्याने खासगो वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासोबतच मद्य प्राशन करून पुणे-नागपूर ट्रॅव्हल्स भरधाव आडवी तिडवी चालवण्याचा प्रकार प्रवाशांना निदर्शनास आल्यावर दारव्हा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक अमृत प्रल्हाद थेर याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button