चंद्रपूर शहरात २१ लाखांचा अवैध देशी दारुसाठा जप्त | पुढारी

चंद्रपूर शहरात २१ लाखांचा अवैध देशी दारुसाठा जप्त

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर शहरात अवैधरित्या देशी दारूची आयात करणाऱ्या दोन आरोपींना 21 लाखाच्या दारूसाठ्यासह आज बुधवारी (दि.५) अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथकास चंद्रपूर शहरात देशी दारू अवैधरित्या दोन वाहनांमधून आयात करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे शहरातील मिळालेल्या गजानन मंदिर वार्ड जवळील गार्डन समोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवली होती. गार्डन जवळ एका घरासमोर दोन जण संशयितरित्या आढळून आले. त्याचे ताब्यातील वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूचा साठा आढळून आला.

(एमएच. 14 डीएन 7569) मध्ये व  (एमएच 02 बीवाय 8154) या दोन्ही वाहनांमध्ये डिक्की व मागील सीटवर 100 खरडयाचे बॉक्स ज्यात 90 एम. एल. नी भरलेल्या देशी दारु रॉकेट संत्रा कंपनीचे 21,10,000 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. रामनगर पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदर दारू साठा अवैधरित्या शहरातील वेगवेगळ्या वार्डात विकण्याकरिता आयात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोलीस अंमलदार संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्रांजल झिलपे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button