

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिष देशमुख सामान्य माणूस नाही, तर कलाकार आहे. त्यांच्याकडे माणसे जोडून ठेवण्याची कला आहे. देशमुख यांनी २०२४ ची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. हे सांगायला धाडस लागते. भाजप परिवार खुल्या मनाने देशमुखांना स्वीकारेल,अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांचे कौतुक केले. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज (दि. १८) भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, आता देशमुख यांचा भाजप हाच शेवटचा पक्ष असेल. देशमुख भाजपवर श्रद्धा आणि स्वत:च्या जीवनात सबुरी ठेवतील, असा विश्वास व्यक्त करून भाजपमध्ये त्यांचे जीवन आणि नेतृत्व मोठं होणार आहे. भाजप हाच त्यांचा अंतिम पक्ष असेल. देशमुख यांच्यामध्ये नेतृत्वाचे प्रचंड गुण आहेत. त्यांनी काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या तोंडाचं पाणी पळवले आहे. नागपूर जिल्हा भाजपचाच आहे, हे आता आम्ही दाखवून देऊ.
हेही वाचा