शरद पवारांची काळजी गृहमंत्री फडणवीस घेतील: नितेश राणे | पुढारी

शरद पवारांची काळजी गृहमंत्री फडणवीस घेतील: नितेश राणे

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. परंतु, हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे नव्हे, तर भाजप-सेनेचे सरकार आहे. शरद पवार यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच काळजी घेतील, चिंता नको, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

अमरावतीला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर ते आले असता माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्ष झाल्यानिमित्त अमरावतीला कार्यक्रम, विविध मेळावे आहेत. पक्षामार्फत प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्या अंतर्गत हा दौरा आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. अनेकांच्या जीवाला धोका असला तरी सुरक्षा नव्हती. तसे काही आम्ही करणार नाहीत. सुप्रिया सुळे यांना मी सांगेन की हे महाविकास आघाडीचे सरकार नव्हे, तुम्ही चिंता करू नका, शरद पवार यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे. खासदार संजय राऊत यांना देखील धमकी आली आहे. पण आता मच्छर मारण्यासाठी कोणाला धमकी देण्याची गरज नाही. पायाचा बूट हलवला, तरी मच्छर मरतो, असा उपरोधिक टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

हेही वाचा 

Back to top button