वाशिमचे सचिन दीक्षित बसणार कोण होणार करोडपतीच्या हॉट सीटवर

कोण होणार करोडपती
कोण होणार करोडपती

सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 'आता मागे नाही राहायचं', असं सांगत 'कोण होणार करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी एक नाही तर तब्बल २ करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. म्हणजेच 'कोण होणार करोडपती'  कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम दुप्पट झाली आहे. प्रश्नोत्तरांच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. वाशीम चे सचिन दीक्षित ८ आणि ९ जुन रोजी हॉट सीटवर बसणार आहेत.

निरनिराळ्या क्षेत्रांतील स्पर्धक 'कोण होणार मंचावर पाहायला मिळतात. या पर्वात सहभागी होण्यासाठी तब्बल १४ लाख स्पर्धकांनी नोंदणी केली होती. पुढील नोंदणी प्रक्रियेला सामोरे जात त्यातून काही स्पर्धक निवडले गेले. आपली स्वप्नपूर्ती व्हावी, या आशेने हे प्रेक्षक या खेळाचा भाग होतात.

मूळचे वाशिमला राहणारे आणि पुण्यात स्थायिक असलेले सचिन दीक्षित हे हॉट सीटवर येणार आहेत. या पर्वातल्या पाहिल्याच काही स्पर्धकांमध्ये सचिन दीक्षित यांचा समावेश झाल्याने वाशीम मधील प्रेक्षकांची मान अभिमानाने ताठ झाली असेल. सचिन दीक्षित हे एका आयटी कंपनीत कार्यरत आहेत. त्या शिवाय सचिन शनिवार- रविवार मध्ये पुणे कॉर्पोरेशनसाठी फ्रीलान्सर म्हणून टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात. सचिन यांनी इंडॉलॉजीमध्ये एमए केले आहे. आता कोण होणार करोडपतीच्या हॉट सीटवर आल्यावर सचिन कशाप्रकारे खेळतात आणि करोडपती व्हायचे त्यांचे स्वप्न पूर्ण करतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सचिन दीक्षित ह्यांना नव्या पर्वात हॉट सीटवर येण्याची संधी मिळाली आहे. सचिन दीक्षित किती रक्कम जिंकून जातात हे पाहणे वाशीमकरांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती गुरवारी आणि शुक्रवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news