केवळ नाव नको, महापुरुषांच्या विचाराने वागा; नाना पटोलेंचा सल्ला | पुढारी

केवळ नाव नको, महापुरुषांच्या विचाराने वागा; नाना पटोलेंचा सल्ला

नागपूर; पुढारी ऑनलाईन : नामकरण निर्णय स्वागतार्ह असून अहिल्यादेवी होळकर यांनी पुरोगामी विचार दिला. त्या विचाराने सरकारने काम करावे, केवळ नाव देण्याची घोषणा करून खिरापत वाटण्याचं काम सुरू केलं आहे. मुळात यांच्याजवळ जनतेला सांगण्यासाठी आणि काही जनतेच्या हिताचे काम नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला.

नाना पटोले म्हणाले की, आधीच औरंगाबाद नावाचा घोळ कायम आहे. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीसाठी महापुरुष प्रतिमा बाजूला केली. सरकारने या दोन तोंडी कारभाराचे आधी उत्तर द्यावे कारण, लोकांचा विश्वास आता सरकारवर राहिला नाही. हे नापास झालेले सरकार आहे. कितीही प्रयत्न केला तरी, डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही. सातत्यानं कुणबी- मराठामध्ये भांडण लावण्याच काम सुरू आहे, नागपूर कोर्टात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपविले. त्यात वकिलांनी माहिती लपवली असे सांगितले, कोण-कोणाची दिशाभूल करत आहे हे सांगत येत नाही.

मराठा- कुणबी हे काय चाललंय महाराष्ट्रात, कुणबीला किती आरक्षण? आणि मराठा यांचं आरक्षण किती? हे स्पष्ट करावे, दोन समाजात भांडण लावण्याच काम हे सरकार करत आहे का? हे स्पष्ट करावे. मराठा- कुणबी समाज जागृत आहे, हा डाव यशस्वी होणार नाही, लोकांची दिशाभूल करण्याच काम सरकार करत आहे, मराठ्यांना कुणबी करू असे म्हणत आता सरकारने फसगत करू नये, सरकार मनमानी काम करत आहे, जाहिरातीवर हजारो कोटी खर्च ही जनतेच्या पैशांची लूट केली जात आहे,

शहराचे नाव बदलून भाजपला फायदा होणार नाही?, मागील ९ वर्षापासून विश्वगुरू होणार म्हणणारे यांनाही फायदा होणार नाही?, ओबीसी समाजाचे काढून मराठा समाजाला देणार आहे असे सांगून, राजकीय पोळी शेकण्याचं काम भाजप सरकार करीत आहे. आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला नाही. राज्य विधिमंडळात कायदा करून समाजाची फसवणूक केली. शब्दफेक करून कुणबी- मराठ्यांत भांडण लावण्याचे काम करत आहे असेही ते यावेळी म्हणाले.

कोरोना काळात मविआ सरकारने लोकांचा जीव कसा वाचवला हे महत्वाचे असल्याने फडणवीस यांनी उगीच लकव्याची भाषा करू नये, पाहिले केंद्र सरकारच्या धोरणाचा अभ्यास करावा नंतर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावे असे खडेबोल ही त्यांनी यावेळी सुनावले.

हेही वाचा : 

Back to top button