नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपाने या लोकशाही प्रधान देशात असलेल्या अनेक रूढी परंपरा मोडीत काढण्याचा सपाटा लावला आहे. राष्ट्रपती अभिभाषण करतात ही प्रथा आहे, त्याला पण मोडून टाका, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता गौरव वल्लभ (Gaurav Vallabh) यांनी भाजपला लगावला. नागपूरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
वल्लभ (Gaurav Vallabh) म्हणाले की, संसद हे एक मंदिर आहे, या मंदिराचे उद्घाटन करण्याचा अधिकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला नाही, राष्ट्रपतींना आहे. मुळात संसदेची कार्यवाही तेव्हाच सुरू होते. जेव्हा राष्ट्रपती अभिभाषण करतात. मग ही प्रथा आहे, त्याला पण मोडून टाका. संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला २० विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. ही काही लहान बाब नाही, किंबहुना ही मोठ्या शरमेची बाब आहे.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला. वल्लभ म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की रोज ३८ किलोमीटरचे रोड कसे निर्माण होतात. दोन पदरी रस्त्याला चार पदरी कसे करतात. विंडो ड्रेसिंग आणि क्रिएटिव्ह अकाऊंट करू नये, आम्हाला सर्व माहिती आहे, असे वल्लभ म्हणाले.
हेही वाचा