पुन्हा खासदार, आमदार येणार शिंदे गटात; खासदार कृपाल तुमाने यांचा दावा | पुढारी

पुन्हा खासदार, आमदार येणार शिंदे गटात; खासदार कृपाल तुमाने यांचा दावा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना पुन्हा ठाकरे गटातून खासदार, आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा रामटेकचे शिवसेना खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय कृपाल तुमाने यांनी केला आहे.

बुधवारी शिवससेनेची बैठक झाली. त्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही १३ खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तेच मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. इतर लोकसभा मतदारसंघांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी इतर पक्षांची दलाली करताना आपल्या पक्षाचा सत्यानाश केला असताना उद्धवजी काही बोलत नाहीत, असा संताप तुमानेनी व्यक्त केला.

Back to top button