एकजुटीशिवाय भाजपचा पराभव होणार नाही : अॅड. प्रकाश आंबेडकर

एकजुटीशिवाय भाजपचा पराभव होणार नाही : अॅड. प्रकाश आंबेडकर

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षांनी एकत्रितपणे भाजपचा मिळून सामना केल्याशिवाय त्याचा पराभव होणार नाही असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

मविआतील घटक पक्षांनी अहंकार कमी केला तर भाजपचा पराभव शक्य आहे, असा सल्ला देताना आंबेडकर म्हणाले की, 'काँग्रेस स्वतःला आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष मानण्याचा समंजस्यपणा दाखवेल असे मला वाटत नाही. मात्र, महाविकास आघाडीतील आपला संभाव्य प्रवेशाचा मुद्दा आपण उद्धव ठाकरे यांच्यावर सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुम्हाला महाविकास आघाडीत घेण्याची जबाबदारी माझी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे ती गोष्ट आम्ही त्यांच्यावरच सोडून दिली आहे.'

दरम्यान, महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली. पटोलेंच्या या विधानामुळे आघाडीतील बिघाड स्पष्टपणे दिसून येतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news