चंद्रपूर : विद्युत शॉक लागून शेतकऱ्याचा मृ्त्यू | पुढारी

चंद्रपूर : विद्युत शॉक लागून शेतकऱ्याचा मृ्त्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  स्वतःच्या शेतात भाजीपाला बागेला मोटार पंपद्वारे पाणी देण्याकरिता गेलेल्या एका शेतकऱ्याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. तर वडिलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलगा गंभीर तर आई किरकोळ जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि.१५) दुपारी तीन वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील सोनापूर शेतशिवारात घडली. तेजराम दादाजी भुरसे (वय ६४) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून दिनेश तेजराम बोरसे (२८) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

शेतकरी तेजराम दादाजी भुरसे हे सावली तालुक्यातील सोनापूर येथील निवासी आहेत. त्यांना तालुक्यांतील वैनगंगा नदीकाठावर शेत आहे. त्या शेतात भाजीपाला बाग लावण्यात आली आहे. ते नेहमीच बागेला मोटारपंप द्वारे पाणी देत होते.  सोमवारी दुपारी वडिल तेजराम दादाजी भुरसे, मुलगा दिनेश तेजराम बोरसे व आई तिघे मिळून शेतात गेले होते. नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजता वडील तेजराम दादाजी भुरसे पाणी देण्यासाठी मिटारपंप सूरु करण्यासाठी गेले असता त्यांना जबर विद्युत शॉक बसला. वडिल होरपळत असताना जवळच असलेला मुलगा दिनेश व आई धाऊन गेलेत. यामध्ये दिनेश वडीलाला वाचविण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला. तर आई किरकोळ जखमी झाली. वडिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे माहिती लगतच्या शेतकऱ्याला झाल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला त्यामुळे दिनेश बचावला.

घटनेची माहिती गावात पसरताच सावली पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. वडिल तेजराम भूरसे याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. तर मुलगा दिनेशला लगेच गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तो मृत्यूशी झुंज देत आहे. तर किरकोळ जखमी झालेली आई घरीच आहे. विद्युत शॉक लागून वडिलाचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button