ठाण्यातील कोळी भवनाला अनंत तरे यांचे नाव, महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या राज्य कार्यकारिणीत निर्णय | पुढारी

ठाण्यातील कोळी भवनाला अनंत तरे यांचे नाव, महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या राज्य कार्यकारिणीत निर्णय

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र कोळी समाज संघाची राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच लोणावळा येथे संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि ठाण्यातील कोळी भवनाचे स्वर्गीय अनंत तरे असे नामकरण करण्याचा ठराव पारित झाला.

महाराष्ट्र कोळी समाज संघाची राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची सुरवात एकविरा देवी, महर्षी वाल्मिकी ऋषी आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे संस्थापक स्व. अनंत तरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली. सचिव मदन भोई यांनी संघाच्या पुढील वाटचालीचा आढावा संक्षिप्त रुपात घेतला. राज्यातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपली ओळख देऊन संघाच्या पुढील वाटचाली बद्दल सुचना व मार्गदर्शन केले. मराठवाडा प्रमुख माजी नगरसेवक सिध्देश्वर कोळी, सांगलीचे एकनाथ सुर्यवंशी, सोलापुरच्या भारती कोळी यांची भाषणे झाली.

अध्यक्षीय भाषणात जयेश तरे म्हणाले की, माझे वडील स्वर्गीय अनंत तरे यांनी कोळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या संघटनेचे कार्य मी चालू ठेवून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन. तसेच लवकरच स्व. अनंत तरे यांची स्वप्नपुर्ती असलेल्या ठाण्यातील कोळी भवनाचे उद्घाटन होणार आहे. तसेच लवकरच राज्यातील कोळी बांधवांना संघटीत करण्यासाठी रुपरेषा आखली जाईल असे सांगितले.

बैठकीला राज्यातून भालचंद्र कोळी, दिपक वाघ, पी. वाय. कोळी, पंढरीनाथ कोणे, तनुजा पेरेकर, संजय बोईणे, प्रल्हाद कदम, बापू जगदे, प्रल्हाद शिंदे, चारुदत्त कोळी, रजनी केणी, कुसुम वैती, साधना केणी, अतुल चिव्हे, दिगंबर गुडदे, किशोर भोईर, धनंजय कोळी, प्रल्हाद कोळी, रघुनाथ मुकादम, मल्लू शेठ कोळी, रमेश तरे, अजय पाटील, एकविरा देवस्थान ट्रस्टचे नवनाथ देशमुख आदि पदधिकारी उपस्थित होते.

यावेळी ठाणे शहर संघटक पदी संजय भोई, रायगड महिला संघटक पदी तनुजा पेरेकर, विदर्भ प्रमुख पदी दिपक वाघ, मुंबई चेंबुर-माहुल संघटक पदी चारुदत्त कोळी, सांगली उप शहर संघटक पदी प्रमोद नाईक, संजय सुर्यवंशी, नवी मुंबई संघटक महेश कोळी, जालना जिल्हा संघटक पदी भुजंग सुरासे, रायगड म्हसला उप संघटक पदी जनार्धन बेंडकोळी यांना नियुक्ती पत्र देऊन अध्यक्ष जयेश अनंत तरे यांनी शुभेच्छा दिल्या. बैठकीला राज्यातून शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button