बाजार समिती निवडणूक: नागभीड, गोंडपिपरी भाजप, सिंदेवाही, पोंभूर्णा, राजूरा काँग्रेस, तर भद्रावतीत शिवसेनेचा सभापती | पुढारी

बाजार समिती निवडणूक: नागभीड, गोंडपिपरी भाजप, सिंदेवाही, पोंभूर्णा, राजूरा काँग्रेस, तर भद्रावतीत शिवसेनेचा सभापती

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर जिल्ह्यात निवडणूक पार पडलेल्या 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज (दि.13) निवडणूक पार पडली. नागभीड व गोंडपिपरी येथे भाजपाची एकहाती सत्ता आली. त्यामुळे नागभीड येथे आवेश पठाण सभापती तर रमेश बोरकर उपसभापती तर गोंडपिपरी येथे इंद्रपाल धुडसे सभापती व उपसभापतीदावर स्वप्नील अनमुलवार म्हणून निवडून आले. सिंदेवाही व पोंभूर्णा येथे काँग्रेसची एकहाती सत्ता आली. त्यामुळे सिंदेवाहीत रमाकांत लोधे सभापती तर दादाजी चौके उपसभापती तर पोंभूर्णा येथे रवि मरपल्लीवार सभापती व आशिष कावटवार उपसभापती बनले.
भद्रावती येथे  शेतकरी सहकार ठाकरे गटाने कमाल केली. एकहाती सत्ता आल्याने येथे भास्कर  लटारी ताजणे सभापती व अश्लेषा शरद जिवतोडे उपसभापतीपदावर विराजमान झाले. राजूरा येथे शेतकरी संघटनेची सत्ता उलथवून टाकण्याकरीता काँग्रेस व भाजप – शिवसेनेने युती केली. या युतीतील काँग्रेसचे विकास देवाळकर सभापती तर भाजपचे संजय पावडे उपसभापती बनले. सहा बाजार समित्यांपैकी सिंदेवाही  व पोंभूर्णा, या 2 ठिकाणी काँग्रेस, नागभीड, गोंडपिपरी  या 2 ठिकाणी भाजपा. तर भद्रावतीत ठाकरे गट 1 तर राजूरा येथे काँग्रेस, भाजप युतीचे 1  सभापती बनलेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही :

सिंदेवाही येथे काँग्रसे प्रणीत शेतकरी विकास आघाडीने 18 पैकी 11 जागा मिळविल्या. तर भाजपा समर्थित पॅनलने 7 जागा मिळविल्या होत्या. या ठिकाणी काँग्रेसची जादू चालल्याने सत्ता ठेवली. आज सभापती व उपसभाती पदाच्या निवडणूकीत 11 विरूध्द 7 मतांनी विजय झाल्याने काँग्रेसचे रमांकात लोधे सभापती, तर उपसभापतीदावर दादाजी चौके निवडणून आले. कॉग्रेस समर्थित गटाच्या विजयी उमेदवारांमध्ये राहुल बोडणे, जगदीश कामडी, संजय पुपरेड्डीवार, नरेंद्र गहाणे, मंगेश गभणे, जयश्री नागापुरे, भास्कर घोडमारे, नरेंद्र भेसारे, जानकीराम वाघमारे तर भाजप प्रणीत गटाच्या विजयी उमेदवारांमध्ये राजेंद्र बोरकर, श्रीराम डोंगरवार, नामदेव मोहुलै, मधुकर जल्लावार, चंद्रशेखर हटवादे, सुखदेव चौके, कल्पना डोंगरवार यांचा समावेश आहे.
मागील पंचवार्षीक निवडणूकीत या ठिकाणी भाजपाची सत्ता होती. मात्र माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांचे नेतृत्वात यावेळी काँग्रेसने भाजपाची सत्ता अलथवून 11 जागांवर विजय मिळविला. भाजपाला फक्त 7 जागांवर समाधान मानावे लागले.  काँग्रेस प्रणीत पॅनलतर्फे सभापती पदासाठी रमाकांत लोधे, तर उपसभापती पदाकरीता दादाजी चौके यांनी नामांकन केले होते. प्रतिस्पर्धी भाजपकडून सभापती   पदाकरीता सुखदेव चौके यांचे नामांकन होते. ११ विरुद्ध ७ मतांनी रमाकांत लोधे तर उपसभापती पदासाठी दादाजी चौके विजयी झालेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती नागभीड :

मागील पंचवार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाची सत्ता होती. यावेळी निवडणुकीमध्ये भाजप विरूध्द काँग्रेस अशी लढत होती. परंतु भाजपाने 14 जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता मिळविली. भाजपा प्रणीत पॅनलचे 14 उमदेवार तर काँग्रेस प्रणीत पॅनलचे 4 उमेदवार विजयी झालेत. भाजपने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले.  आज सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. यावेळी भाजपाकडून 1 उमेदवार गैरहजर होते. त्यामुळे 13 विरूध्द 4 मतांनी सभापतीपदावर भाजपाचे आवेश पठाण तर उपसभापतीपदावर रमेश बोरकर निवडून आलेत. आवेश पठाण हे सलग दुसऱ्यांदा सभापतीपदावर निवडून आले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती :

भद्रावती कृषी उत्पनन्  बाजार समिती निवडणुकीमध्ये खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर नेतृत्वात काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनल विरूध्द सहकार ठाकरे गट असा सामना झाला. यामध्ये खासदार व आमदार दाम्पत्यांचा ठाकरे गटाने 18 पैकी 12 जागांवर विजय मिळवित पराभव केला. तर प्रतिस्पर्धी पॅनलला फक्त 6 जागा मिळाल्या.
आज पार पडलेल्या सभापती व उपसभापी पदाच्या निवडणुकीत  सभापती पदावर भास्कर  लटारी ताजणे यांची तर अश्लेषा शरद जिवतोडे यांची उपसभापती पदावर निवड करण्यात आली. ठाकरे गटाने विजय खेचून आणल्याने काँग्रेस प्रणीत पॅनलला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.

कृषी उत्पन बाजार समिती पोंभूर्णा :

पोंभूर्णा कृषी उत्पनन्‍ बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी पॅनल विरूध्द भाजपाप्रणीत    शेतकरी आघाडी पॅनलमध्ये लढत झाली. यामध्ये 18 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवित भाजपाच्या सत्तेची उलथापालथ केली. शेतकरी आघाडीला फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले. आज सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीकडून रवि मरपललीवार तर उपसभापती पदासाठी आशिष कावटवार यांनी नामांकण दाखल केले तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या पॅनलकडून सभापती पदाकरीता नैलेश चिचोलकर तर उपसभापतीपदाकरीता धनराज सातपुते यांनी नामांकन दाखल केले होते. सभापती व उपसभापती पदाकरीता प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु 11 विरूध्द 7 मतांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय संपादन केल्याने सभापतीपदी रवि मरपल्लीवार व उपसभापतीपदी आशिष कावटवार यांची वर्णी लागली. ही निवडणूक खासदार बाळू धानोरकर व माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांचे मार्गदर्शनात लढविण्यात आल्याने पोंभूर्णामध्ये सत्तेची उलथापालथ करून काँग्रेसने सत्ता स्थापन केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी :

गोंडपिपरी येथे बाजार समितीच्या स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी काँग्रेसच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला आहे. काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केली आहे.  आज पार पडलेल्या सभापती व उपसभापतीची निवडणूक अविरोध झाली. सभापती पदावर भाजपाचे इंद्रपाल धुडसे व उपसभापतीदावर स्वप्नील अनमुलवार यांची निवड झाली. भाजपाने काँग्रेसची सत्ता उलथापलथ करीत 12 जागांवर विजय मिळविला होता. तर प्रतिस्पर्धी काँग्रसेला फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले.

कृषी उत्पन्न बाजार समिती राजूरा :

20 वर्षांपासून राजूरा कृषी उत्पन्न् बाजार समितीमध्ये शेतकरी संघटनेची सत्ता होती.  मात्र यावेळी काँग्रेस सोबत भाजपाने हात मिळवणी करून अभद्र युती केल्याने 15 जागांवर विजय मिळविला. शेतकरी संघटनेच्या वाट्याला 3 जागा मिळाल्या. अने वर्षांपासूनचा शेतकरी संघटनेचा गड अभद्र युतीच्या प्रहाराने ढासळला आहे.  आज सभापती व उपसभापती पदाची निवडणुक अविरोध झाली. सभापतीपदाकरीता काँग्रेसचे विकास देवाळकर व उपसभापतीपदाकरीता भाजपाचे संजय पावडे यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने दोन्ही पदावर अविरोध विजयी झाले. नवनिर्वाचित संचालकांमध्ये अॅगड. अरूण मु. धोटे, उमाकांत धांडे, विनोद झाडे, आशिष नलगे, सरिता अजय रेड्डी, तिरुपती इंदूरवार, जगदीश बुटले, लहु बोंडे, गोपाल झंवर, सतिश कोमरवेल्लीवार, विठ्ठाबाई झाडे, राकेश हिंगाने, नवनाथ पिंगे, प्रभाकर ढवस, दिलीप देठे, प्रफुल्ल कावळे आदींचा समावेश आहे.
आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अॅड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, भाजपा नेते सतीश धोटे, अरुण म्हस्के, राधेश्याम अडाणीया, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शंकर बोंकुर, शंकर गोनेलवार, अभिजित धोटे, मिलिंद देशकर आदींनी सभापती व उपसभापतींचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा 
 

Back to top button