चंद्रपूर : दुचाकीची अपघातांत बापलेकाचा मृत्यू; दोघे गंभीर

चंद्रपूर : दुचाकीची अपघातांत बापलेकाचा मृत्यू; दोघे गंभीर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :   गावी परत जाताना  दुचाकीस्वाराचे वाहनावरील ताबा सुटून पुलाला धडकल्याने बाप लेक ठार झाले तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात आज (दि.८) सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परमडोली-जिवती मार्गावर झाला. सचिन राजाराम गायकांबळे (वय ४०), अनुष सचिन गायकांबळे (वय ७) असे अपघातात ठार झालेल्या बाप-लेकाचे नाव आहे.

जिवती तालुक्यातील केकेझरी निवासी सचिन राजाराम गायकांबळे (वय ४०), अनुष सचिन गायकांबळे (वय ७) व अन्य दोघेजण आज सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून गावी केकेझरी निघाले होते. जिवती-परमडोली मार्गावर वाहनावरील ताबा सुटून पुलाला जोरात धडक बसली. अपघात एवढा भीषण होती की, वडील आणि मुलगा जागीच ठार झाले. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news