यवतमाळ : विनयभंग करणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा कारावास

यवतमाळ : विनयभंग करणाऱ्या आरोपीस दोन वर्षांचा कारावास

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : शेतात कापूस वेचत असलेल्या महिलेचा आरोपीने विनयभंग केला. या खटल्यात विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावास व ३७ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

अरविंद भगवान कुबडे (वय ३४, रा. दहेगाव, ता. राळेगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २ नोव्हेंबर २०१६ रोजी साडेचार वाजण्याच्या दरम्यान शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी वडकी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत त्याचा दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. विशेष सत्र न्यायाधीश डॉ. गौरी कवडीकर यांच्या न्यायालयात या खटल्यात सहा साक्षीदार तपासले. साक्षग्राह्य मानत न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावास व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा केली. तसेच कलम ५०६ भादंवि अंतर्गत सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीला सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. सरकारी पक्षातर्फे अॅड. शुभांगी वीरेंद्र दरणे यांनी युक्तिवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी राठोड यांनी सहकार्य केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news