चंद्रपूर : साठगाव-रोहणा रस्त्यावरील खड्यात झाडे लावून केला निषेध

चंद्रपूर : साठगाव-रोहणा रस्त्यावरील खड्यात झाडे लावून केला निषेध

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यातील साठगाव-रोहणा फाट्यापर्यंतच्या आठ किलोमीटर रस्त्याचे काम साडेतीन वर्षापूर्वी मंजूर झाले. मात्र, अद्याप रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली नाही, त्यामुळे रस्ता पूर्ण उखडला असून रस्त्यावर खड्याचे साम्राज्य आहे. जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आज (८ मे) रोजी रस्त्यावरील खड्यांमध्ये लाजाळूचे झाडे नागरिकांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले.

साठगाव ते रोहना फाट्यापर्यंत ८ किमीचा रस्ता अनेक वर्षापासून उखडला आहे. ठीक ठिकाणी खड्डे पडले आहे. ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. भिवापूरची मुख्य बाजार पेठ साठगाव पासून फक्त १० किलोमीटर अंतरावर आहे. परिसरातील नागरिकांना या उखडलेल्या रस्त्याने जावे लागते. रस्त्याच्या बांधकामाची अनेक वर्षापासून मागणी आहे. याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१९ ला आठ किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला. कामाचे कंत्राट देण्यात आले. साडेतीन वर्षाचा कालावधी होऊनही खड्याच्या रस्त्यावरील अपघाताची जोखीम अजून संपली नाही.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता कार्यालयाला काम सुरू करण्याबाबत अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आला. परंतु या मागणीची अद्याप दखल घेण्यात आली. 1 फेब्रुवारीला उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.त्यावेळी लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले होते. मात्र पावसाळा येऊनही काम सुरू नाही. त्यामुळे आज सोमवारी साठगाव ग्रांम पंचायत उप सरपंच प्रीती दीडमुठे यांचे नेतृत्वात गावकऱ्यांच्या सहकार्याने एक दिवसीय उपोषण करून रस्त्यावरील खड्यामध्ये बेशरमचे झाडे लावण्यात आले. या आंदोलनाला काँगेस पक्ष्याचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे, शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी पाठिंबा दिला आहे. बेशरमाचे झाडे लावल्याने आतातरी बांधकाम विभागाला रस्ता दुरूस्तीची जाणीव होईल्, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news