राजापूर : हुकुमशाहीच्या बळावर प्रकल्प लादल्यास याद राखा; उद्धव ठाकरेंचा इशारा

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा कोकणातला भूमीपुत्र आपल्या हक्काची जमीन वाचवण्यासाठी आक्रोश करतोय. पण सत्तापिपासू सरकारपर्यंत हा आक्रोश कधीच पोहचणार नाही. येथील जनतेवर हुकुमशाहीच्या बळाचा प्रकल्प लादायचा प्रयत्न कराल तर याद राखा, नाहीतर महाराष्ट्र पेटवू असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बारसू सोलगाव वासीयांसी संवाद साधताना दिला. लोकांना नको असलेला प्रकल्प कोकणात का लादता महाराष्ट्राची राखरांगोळी तर गुजरातला रांगोळी अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी फटकारले.
बारसूवासीयांची भेट घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी तेथील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी तेथे मोठ्या संखेने जमलेल्या प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणा देवुन त्यांचे लक्ष वेधले. त्यावेळी उध्दव ठाकरेंसमवेत सेना पदाधिकाऱ्यांचा मोठा फोजफाटा उपस्थीत होता. त्यानंतर उध्दव ठाकरेंनी परीसरातील कातळशिल्पांचीही पहाणी केली.
हेही वाचा :