अकोला : डॉक्टरचा जबरदस्तीने रुग्णासोबत अनैसर्गिक संभोग ! - पुढारी

अकोला : डॉक्टरचा जबरदस्तीने रुग्णासोबत अनैसर्गिक संभोग !

अकोला; पुढारी वृत्तसेवा

अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे याने एका रुग्णासोबत अनैसर्गिक संभोग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉ. शेवाळे यास अटक केली.

सिव्हील लाईन पोलीस स्टेशनला पीडित इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे मित्र व ते डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे 41 रा. संभाजीनगर यांच्याकडे उपचारासाठी गेले होते. आरोपी डॉक्टरने त्यांच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध साधले. तसेच त्यांना वारंवार फोन करून त्रास देत होते. त्यानुषंगाने डॉक्टरच्या कुकृत्याचे स्टिंग ऑपरेशन करावे म्हणून फिर्यादीने डॉक्टरांकडे उपचारासाठी गेले असता डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे याने जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग करण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रकाराची व्हिडिओ चित्रण करण्यात आले असून सिव्हिल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डॉ. अनंता ज्ञानेश्वर शेवाळे रा. संभाजी नगर याच्याविरोधात भादवि कलम 377, 506 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button