हिंगणा एमआयडीसीत भीषण आग, तिघांचा मृत्यू, कामगार अडकले ! | पुढारी

हिंगणा एमआयडीसीत भीषण आग, तिघांचा मृत्यू, कामगार अडकले !

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसीत कटारिया ऍग्रो प्रा लि इंडस्ट्रीजला आज दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटणेत 3 कामगारांचा मृत्यू तर किमान 25-30 कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन विभागाचे 10 बंब घटनास्थळी कार्यरत असून कामगारांना बाहेर काढण्यासाठी तसेच ही तासभरापासून घुमसणारी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवान प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख

हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता ही आग नियंत्रणात आहे. या घटनेत 3 कामगार जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसिलदार प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.

 

हेही वाचा : 

Back to top button