गडकरी धमकी प्रकरण, पोलिसांची तीन पथके कर्नाटककडे | पुढारी

गडकरी धमकी प्रकरण, पोलिसांची तीन पथके कर्नाटककडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात १०० कोटींच्या खंडणीसाठी धमकी प्रकरणात पुढील चौकशीसाठी नागपूर पोलिसांची तीन पथके आज कर्नाटककडे रवाना झाली. जयेश हा पीएफआय आणि लष्करसाठी काम करत होता. तो  गूगल पे नंबरवर पैसे मागवायचा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. जयेश हा बेळगाव जेलमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. परंतु त्या आधीच तो PFI संघटनेचा संपर्कात आला. जयेशचा PFI या संघटनेसाठी अजुन कोणत्या घटनात सहभाग राहिला आहे. त्याची चौकशी पोलीस आता करणार आहेत.

नागपुर पोलिसांच्या आज तीन टीम तपासासाठी नागपूरवरून निघाल्या आहेत. यातील दोन टीम बेळगाव आणि बंगळूर इथल्या जेलमध्ये जाऊन तपास करणार असून तिसरी टीम पैसे जमा करण्यास सांगितले त्या अकाउंट बदल माहिती गोळा करणार आहे. दरम्यान, १०० कोटींच्या मागणीसाठी बेळगाव तुरुंगात असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरने धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. अकबर पाशा हा प्रतिबंधित पीएफआयचा सदस्य आहे. त्यामुळे नागपूर पोलीस बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशासह कॅप्टन नसीर, फहद कोया रशीद मालाबारी त्याच्यासह इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार आहेत. जयेश पुजारी उर्फ शाकीरचे देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी संबंध तो बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात होता असेही उघड झाले आहे.

हेही वाचंलत का?

 

Back to top button